
मासेमारी बंदीच्या कालावधीत केलेल्या जाचक बदलामुळे रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमार प्रचंड आर्थिक संकटात
शासनाने मासेमारी बंदीच्या कालावधीत केलेल्या जाचक बदलामुळे रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमार प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. हा नवा बदल रद्द करून मासेमारी बंदीचा कालावधी पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी ’शाश्वत मच्छीमार हक्क संघटना, रत्नागिरी तालुका संघटनेने मागणी केली आहे. चालू हंगामात मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी १० जूनपर्यंत डिझेल पुरवठा सुरू ठेवण्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनाही विशेष विनंती पत्र पाठवण्यात आले आहे.
या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष रणजित भाटकर यांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त यांना अधिकृत निवेदन दिले आहे. पूर्वीच्या नियमाप्रमाणे मासेमारी बंदीचा कालावधी १० जून ते १५ ऑगस्ट असा होता, जो मत्स्य उत्पादनासाठी आणि मच्छीमारांसाठी अत्यंत योग्य होता. मात्र, शासनाने बंदीचा कालावधी १ ऑगस्टपर्यंत केल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांचे अतोनात नुकसान होत आहे. या निवेदनाच्या प्रती योग्य त्या कार्यवाहीसाठी मत्स्यव्यवसाय आयुक्त (मुंबई), रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि परवाना अधिकार्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com




