
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार असून १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच अकोला, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.




