भाजपा प्रदेशाध्यक्ष सन्मा. आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण पुरस्कृत मुरुगवाडा क्रिकेट मंडळ आयोजित नाईट अंडर आर्म लिग क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न.

रत्नागिरी : भा. ज. पा. प्रदेशाध्यक्ष सन्मा. आ.श्री. रविंद्रजी चव्हाण पुरस्कृत, युवा नेते सन्मा. श्री अनिकेतज पटवर्धन आणि शहराध्यक्ष श्री दादा ढेकणे यांच्या सहकार्याने मुरुगवाडा क्रिकेट मंडळ आयोजित नाईट अंडर आर्म लिग क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष श्री समिरजी तिवरेकर, महिला शहराध्यक्ष सौ भक्तीताई दळी, जाकिमिऱ्या सरपंच सौ आकांक्षा निलेश किर, माजी महिला शहराध्यक्ष सौ पल्लवी पाटील, माजी कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री संतोषजी बोरकर, नगरसेवक श्री नितीनजी जाधव, उद्योजक श्री सचिनजी टाकळे,श्री शैलेश बेर्डे, श्री नितीन गांगण, श्री रामभाऊ शेलटकर, श्री विजय मालवदे,श्री मनोर दळी, विजयता भाटकर, श्री रविंद्र कांबळे, श्री विकास मयेकर, श्री सुधीर वायंगणकर, श्री दिलीप भोळे, श्री अनंत भोळे, श्री सतिश भोळे, श्री दिपक भोळे, श्री छोटया मयेकर, श्री मंदार जोशी, श्री अभिषेक भोळे, श्री वैभव भोळे, श्री जयदार भोळे, श्री सनातन भोळे, श्री तुषार पिलणकर, श्री सागर पिलणकर,श्री विक्रांत जोशी, श्री निखिल कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत विजेता संघ ठरला उमर ११ साखरतर , उपविजेता संघ = जय भैरी मुरुगवाडा, मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज = स्मित शिवलकर, सामनावीर = अक्षय चाळके, उत्कृष्ठ गोलंदाज = सिद्दीक, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक = मानस लाकडे ठरला..
या स्पर्धेमध्ये विजेता चषक महिला जिल्हाध्यक्ष सौ वर्षाताई ढेकणे, उपवेजेता चषक शहराध्यक्ष श्री दादा ढेकणे, वैयक्तिक बक्षिसे श्री नितीन जाधव, श्री राजेंद्रजी फाळके, सौ पल्लवी पाटील, श्री संतोषजी बोरकर, श्री अमरशेठ किर यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेसाठी श्री मधुकर बेंद्रे आणि श्री प्रथमेश कांबळे यांनी लाईट व्यवस्था उपलब्ध करून मोठे सहकार्य केले. शेवटी श्री मंदार भोळे आणि सौ मंदिरा मंदार भोळे यांनी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button