
बेपत्ता मुलगा मुंबईत सुखरूप
संगमेश्वर तालुक्यातील एका गावातून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा अखेर मुंबईत सुखरूप शोध लागला आहे. त्याचे कोणी अपहरण केले नसून, आई-वडील रागावल्यामुळे तो रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
११ मे च्या रात्री आई-वडील ओरडल्याचा राग मनात धरून घरातून बाहेर पडला होता. त्याने एका अनोळखी दुचाकीस्वाराकडून संगमेश्वरपर्यंत लिफ्ट घेतली. तिथून मुंबईच्या दिशेने जाणार्या ट्रकच्या सहाय्याने तो खेड (लोटे परशुराम) पर्यंत पोहोचला. त्यानंतर लोटे येथून रेल्वेने त्याने थेट मुंबई गाठली. मुंबईत काही दिवस काढल्यानंतर त्याला घराची आठवण आली. त्याने थेट वडिलांच्या मोबाईलवर फोन केला. वडिलांनी तात्काळ मुंबईतील (मुलुंड) नातेवाईकांशी संपर्क साधून त्याला सुरक्षित ताब्यात घेतले.
www.konkantoday.com




