
दापोली तालुक्यात वॉटर स्पोर्टवर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी
कोकणातील पर्यटनक्षेत्रावर सुरु असलेल जलक्रीडा, नौकाविहार प्रकार अर्थात वॉटरस्पोर्टस् ३१ ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना पर्यटन संचालनालय कोकण विभाग प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. ३१ मे पर्यंत पर्यटनक्षेत्रांवर पर्यटक मोठ्या प्रमाणात असतात. समुद्रकिनार्यावर बोटींग, पॅरेशुट उधाण, डॉल्फिन सफर अशा अनेक जलक्रीडा संदर्भातील सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र पावसाका काही दिवसांवर असून समुदात शिवाय हवामानात बदल होत होत असतो. त्यामुळे २६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यंत जलपर्यटन बंद ठेवण्यात येते. यावर्षीही तशा सूचना प्राप्त झाल्याने समुद्रकिनार्यांवरील जलक्रीडा, नौकाविहार मंगळवारपासून बंद झाल्यचे पहायला मिळत आहे. शिवाय असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.www.konkantoday.com




