
दापोलीत मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात नालासोपाऱ्यातील १८ वर्षीय तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू
दापोली तालुक्यातील दळखण येथे मोटारसायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सूरज मनोहर उके* (वय १८, रा. रूम नं १०३, सद्गुरू अपार्टमेंट, ९० फीट रोड, प्रगतीनगर, नालासोपारा पूर्व) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सूरज उके हा मोटारसायकलवरून दळखण दापोली येथून जात असताना त्याची मोटारसायकल अचानक घसरली. या अपघातात त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी प्रथम शासकीय रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर पुढील उपचारासाठी चिपळूण येथील डेरवण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्याला ११ मे २०२६ रोजी पहाटे २.१५ वाजता मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सायन रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच १४ मे २०२६ रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला




