दहावीचा निकाल जाहीर ,यंदा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के लागला नेहमीप्रमाणे सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा


दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावीचा निकाल जाहीर केला आहे.

यंदा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. सकाळी ११.३० वाजता तुम्हाला निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. तुम्ही https://mahahsscboard.in/ वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.
यंदा दहावीच्या निकालात २ टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, यंदादेखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींना जास्त गुण मिळाले आहे. ९ विभागांचा निकाल जाहीर झाला आहे. कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकणात सर्वाधिक मुले दहावीत पास झाली आहे. याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

राज्यात एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांचा निकाल ९०.५६ टक्के लागला आहे.

महाराष्ट्रातील ९ विभागांचा निकाल (Maharashtra Board SSC Result 2026 Out)

कोकण:९७.६२ टक्के

पुणे: ९४.२४ टक्के

नागपूर: ८९.०७ टक्के

मुंबई: ९४.९७ टक्के

कोल्हापूर: ९५.४७ टक्के

अमरावती: ९०.५० टक्के

नाशिक: ९०.५३ टक्के

लातूर: ८८.४२ टक्के

छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button