
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा बारावीचा निकाल १०० टक्के
नाणीज, दि. २: येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी सायन्स (HSC) परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक परंपरेला उज्ज्वल गौरव प्राप्त करून दिला आहे.
ही प्रशालेची बारावीची सातवी बॅच असून सलग शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखण्यात विद्यार्थ्यांना यश आले आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाचे नवे शिखर गाठले. इंग्रजी माध्यमाची ही शाळा असून येथे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून संपूर्ण शिक्षण मोफत देते. या शाळेत कोणत्याही प्रकारचे विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले जात नाही
यंदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये-
प्रथम क्रमांक : कु. श्रावणी किरण मुळे : ७२.८३%, द्वितीय क्रमांक : सत्यम अनिल कांबळे : ६५.५०%
तृतीय क्रमांक : कु. ऋतुजा अमोल खटावकर : ६०.८३%
या यशाबद्दल जगद्गुरु श्रीमत रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, परमपूज्य कानिफनाथ महाराज, चेअरमन श्री. अर्जुन फुले, तसेच प्रशालेच्या प्राचार्या आबोली पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षकांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




