चिपळूण शहरातील काविळतली येथे फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन उत्साहात


चिपळूण : जिल्हा नगरोत्थान योजना सन २०२४–२५ अंतर्गत चिपळूण नगरपरिषद हद्दीतील काविळतली येथे उभारण्यात आलेल्या फुलपाखरू उद्यानाचे उद्घाटन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न झाले.

शहरात दर्जेदार उद्यान व्हावे, अशी नागरिकांची दीर्घकालीन मागणी होती. ती पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार निकम यांचे कौतुक केले. हे उद्यान लहान मुले, तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याचे आकर्षण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

या प्रसंगी चिपळूण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, महिला शहराध्यक्ष आदिती देशपांडे, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर यांच्यासह योगेश पवार, कपिल शिर्के, संजय गोताड, सफा गोठे, विकी नरळकर, नसरीन खडस, शहनाज वांगडे, शशिकांत मोदी, हर्षाली पवार, निहार कोवले, रसिक देवळेकर, राणी महाडिक, मिस्बाह नाखुदा, वैशाली निमकर, अंजली कदम, अंकुश आवळे, शिल्पा देसाई, गणेश आंग्रे, विकी लवेकर, फैसल कास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

एकूणच, काविळतली येथील हे फुलपाखरू उद्यान चिपळूणकरांसाठी निसर्गसौंदर्याचा आणि विश्रांतीचा नवा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button