चिपळूण येथे वनविभागाच्या ’रत्नागिरीचा बिबट्या’ शॉर्ट फिल्मचे अनावरण


जागतिक बिबट्या दिनानिमित्त चिपळूण येथील वन विभागाच्या स्व. नीलेश बापट दालनात सोमवारी ’बिबट्याविषयी गैरसमज आणि सहजीवन जाणूया या पुस्तकाचे लोकार्पण तसेच ’रत्नागिरीचा बिबट्या विषयावरील शॉर्ट फिल्मचे प्राथमिक अनावरण वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वन्यप्राणी मित्र आणि अभ्यासक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
रत्नागिरी वनविभाग, डब्ल्यूसीएस मुंबई व सहयाद्री संकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ’रत्नागिरीचा बिबट्या ही शॉर्ट फिल्म साकारण्यात आली आहे. या चित्रफितीत बिबट्याच्या जीवनप्रवासाचा शास्त्रशुद्ध आढावा घेत, कोकणातील लोकांचे बिबट्याबरोबरचे सहजीवन अधोरेखित करण्यात आले आहे. ’बिबट्या आपल्या शेजारी, सुरक्षितता आपली जबाबदारी’ या आशयावर आधारित या शॉर्ट फिल्ममधून बिबट्याविषयी पसरलेले गैरसमज, भीती आणि समाजमाध्यमांमुळे निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा यांचे विश्लेषण करण्यात आले. बिबटया हा स्वभावतः मानवावर हल्ला करणारा प्राणी नसून, गेल्या तीन वर्षांच्या आढाव्यानुसार मानवावरच्या हल्ल्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, पक्षीमित्र भाऊ काटदरे, पर्यावरणप्रेमी शाहनवाज शाह, डब्ल्यूसीएस मुबईच्या विद्या आत्रेय, दिप्ती उमरसकर, सहयाद्री संकल्पचे प्रतिक मोरे, शार्दुल केळकर, विराज आठवले, प्रताप नाईकवडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button