
चिपळूण तालुक्यातील सती नाका परिसरात दुकानफोडी; १.०४ लाखांचा ऐवज लंपास
चिपळूण तालुक्यातील सती नाका परिसरात असलेल्या श्री सुकाई रेफ्रिजिरेशन* या दुकानात अज्ञात चोरट्यांनी खिडकी तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली या घरफोडीत सुमारे १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप काशिनाथ कदम (वय ४५, रा. वेहळे कदमवाडी) यांचे सती नाका येथे श्री सुकाई रेफ्रिजिरेशन* नावाचे दुकान आहे. ३ मे रोजी सकाळी ८ ते ४ मे रोजी सकाळी ९ या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुकानाच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी दुकानातील १७ हजार रुपये किमतीचा इमशियन कंपनीचा कॉम्प्रेसर, २५ हजार रुपयांचे एसी व फ्रिज सर्व्हिसिंगचे टूलकिट, डीप फ्रिजची कुलिंग क्वाईल, ब्लोवर, सर्व्हिस पंप, वॉशिंग पाईप, ड्रिल मशीन तसेच सुमारे ३० हजार रुपये किमतीचे रेफ्रिजरेशनसाठी लागणारे तांब्याचे पाईपचे तुकडे असा एकूण १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घटनेनंतर फिर्यादी यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली




