
कोकणच्या फलोत्पादनाला उद्योगाची जोड द्या, सामाजिक कार्यकर्त्या वैजयंती पाटील आणि कृ. आ. पाटील यांची मागणी
कोकणच्या अथांग नैसर्गिक सौंदर्याला वारंवार बसणार्या नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्यातून सावरण्यासाठी आता केवळ शेतीवर अवलंबून न राहता, कोकणातील फलोत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे काळाची गरज बनली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या वैजयंती पाटील आणि कृ. आ. पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन देऊन कोकणाच्या शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण मागणी केली आहे.
कोकणात हापूस आंबा, काजू, फणस, कोकम आणि जांभूळ यांसारखी. अमृततुल्य फळे निसर्गाची देणगी म्हणून लाभली आहेत. मात्र, अवेळी पाऊस आणि चक्रीवादळांसारख्या संकटांमुळे या फळांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानीवर कायमस्वरुपी उपाय म्हणून परदेशातील तंत्रज्ञानाचा वापर करून कोकणातच वाईन, इथेनॉल आणि नैसर्गिक शीतपेयांचे प्रकल्प उभारण्याची आवश्यकता पाटील यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com




