एसएससी परीक्षेत कै. बाबुराव जोशी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शहरातील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यामध्ये कु. पूर्वा आशिष चौघुले हिने ९९.४० टक्के गुण मिळवत संपूर्ण प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. कु. आर्या सुरेंद्र शिंदे हिने ९३.६० टक्के गुणांसह गुरुकुलामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. परी संदीप परमार हिने ९२.२० टक्के गुण मिळवत गुरुकुलामध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
त्यांच्या या यशाबद्दल गुरुकुल विभाग प्रमुख श्री. वासुदेव परांजपे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभाग प्रमुख सौ.अपूर्वा मुरकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शुभदा पटवर्धन तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button