
अमेरिकेला इराणचा मोठा दणका! MQ-9 विमान पाडलं; सर्वात शक्तीशाली ‘F-35’ फायटर जेटही पाडल्याचा दावा!
US Israel Iran War : मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे, या युद्धामुळे होर्मुझचा मार्ग बंद आहे. याचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर झाला आहे. अनेक देशांमध्ये तेलासह गॅसचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे हे युद्ध थांबवण्याची मागणी होत आहे. दोन दिवसापूर्वी दोन्ही देशात सकारात्मक चर्चा झाल्याचे समोर आले आहे. पण आज अमेरिकेने इराणवर पुन्हा एक मोठा हल्ला केला. आता या हल्ल्याला इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे.
अमेरिकेने आत्मसंरक्षणासाठी दक्षिण इराणमधील बोटींवर हल्ला केल्याचा दावा केला. याला प्रत्युत्तर म्हणून, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने अमेरिकेचा MQ-9 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. IRGC ने अमेरिकेचा RQ-4 ड्रोन आणि F-35 लढाऊ विमानाला इराणी हवाई हद्दीतून बाहेर काढण्यास भाग पाडल्याचाही दावा केला आहे.
दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांनी आखाती देश आणि अमेरिकेसंदर्भात एक मोठे निवेदन जारी केले आहे. आखाती देश यापुढे अमेरिकेच्या लष्करी तळांसाठी ढाल म्हणून काम करणार नाहीत, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. आखाती प्रदेश यापुढे अमेरिकेसाठी सुरक्षित आश्रयस्थान राहणार नाही. वेळ मागे फिरवता येणार नाही आणि या प्रदेशातील देश हीच परिस्थिती यापुढे स्वीकारणार नाहीत. पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचा प्रभाव सातत्याने कमकुवत होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, युद्ध टाळण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की, संभाव्य १४-कलमी सामंजस्य करारातील अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे, मात्र अंतिम करार होण्यास अजून बराच वेळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चर्चेचा मुख्य भर युद्ध थांबवणे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवण्यावर आहे. या बदल्यात, इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीची खात्री करण्यासाठी पावले उचलू शकतो. वृत्तानुसार, प्रस्तावित करारामध्ये ६० दिवसांची युद्धबंदी, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि प्रदेशातील तणाव कमी करणे यांचा समावेश असू शकतो.
हल्ल्यांसोबतच वाटाघाटी सुरू
दरम्यान, युद्ध टाळण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले की, संभाव्य १४-कलमी सामंजस्य करारातील अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे, पण अंतिम करार होण्यास अजून बराच वेळ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चर्चेचा मुख्य भर युद्ध थांबवणे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवण्यावर आहे.




