सीएसएमटी-मडगाव साप्ताहिक ११ जूनपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून धावणार


उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर, केलेली सीएसएमटी-मडगाव साप्ताहिक स्पेशल कोकण मार्गावर ११ जूनपर्यंत धावणार आहे. ०११७१/०११७२ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव साप्ताहिक स्पेशल १६ एप्रिलपासून सेवेत दाखल झाली आहे. दर गुरुवारी धावणारी स्पेशल सीएसएमटी येथून रात्री १२.२० वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहचते. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटी स्थानकात पोहचते. २२ डब्यांच्या स्पेशलला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी करमाळी स्थानकात थांबे आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button