वाहतूकीस अडथळा करणाऱ्या दोन वाहन चालकांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी, ता.२८ ः शहरातील आठवडा बाजार ते जयस्तंभ जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या दोन वाहन चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय आत्माराम भोसले (वय ३२, रा. पारगांव उमरा ता. पाटोदा जि. बीड) व आदिल सलीम काझी (वय २९, रा. झाडगाव एमआयडीसी, रत्नागिरी) अशी संशयित चालकांची नाव आहे. या घटना सोमवारी (ता. २७) सकाळी अकराच्या सुमारास आठवडा बाजार ते जयस्तंभ जाणाऱ्या रस्त्यावर अरिहंत मॉल समोर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अक्षय भोसले यांने ट्रक (क्र. एमएच-४२ बीयु ४४०२) तर आदिल काझी याने मोटार (क्र. एमएच-०८ झेड ६१६१) ही सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल असा पार्क केली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश बागूल व वैभव नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित ट्रक व मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button