
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळइयत्ता १० वी, १२ वी परीक्षांसाठी ऑनलाईन नाव नोंदणी सुरू२१ मे अंतिम मुदत
*रत्नागिरी, दि. 24 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज स्वीकृती कालावधी २२ एप्रिल ते २१ मे असा निश्चित करण्यात आला असल्याचे कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवाने कळविले आहे.
खासगी विद्यार्थ्यांनी फॉर्म क्रमांक १७ ऑनलाईन पद्धतीने भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
इयत्ता १० वी व १२ वीसाठी नावनोंदणी शुल्क १११० रुपये तसेच १०० रुपये प्रक्रिया शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अधिक माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
000




