
मारहाणप्रकरणी चालकावर कारवाई व्हावी या मागणीसाठी उपोषणाचा इशारा
रत्नागिरी एसटी विभागातील सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रदुम्न शिरधनकर यांना एका चालकाकडून स्थानकप्रमुख कार्यालयात मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीबाबत संबंधित चालकावर कारवाई करण्यात यावी. तसेच पतीला न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांच्या पत्नी पूजा प्रदुम्न शिरधनकर यांनी १ मे रोजी एसटी विभाग कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून नवनियुक्त विभाग नियंत्रक अभ्वदीप जानराव यांची भेट घेतली तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासंदर्भात निवेदन सादर केले. प्रदुम्न शिरधनकर हे रत्नागिरी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना झालेली मारहाण ही दुर्दैवाची, लाजीरवाणी अन् शरमेने मान खाली जाण्यासारखी बाब आहे. सदर घटनेची सर्व कागदपत्रे, पुरावे असताना महामंडळाच्या शिस्त व आवेदन पद्धतीनुसार सदर चालकावर त्याचवेळी कार्यवाही होणे अपेक्षित होते. शिरधनकर यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पत्नी पूजा शिथनकर या १ में कामगार दिनी करीत असलेल्या उपोषणास आमच्या संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. या सेवा शक्ती संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com




