
मजुरांच्या टंचाईवर पर्याय, ’क्रेन’च्या मदतीने काढले हापूस आंबे
हापूस आंब्याचा हंगाम सध्या रत्नागिरीत पूर्ण जोमात आहे मात्र, एकीकडे आंबा हंगामाची जोरदार गडबड सुरु असताना दुसरीकडे मजुरांच्या प्रचंड टंचाईमुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. या गंभीर संकटावर मात करण्यासाठी रत्नागिरीतील एका कल्पक बागायतदाराने चक्क ’क्रेन’ची मदत घेत आंबा काढणीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाची सध्या संपूर्ण रत्नागिरीत जोरदार चर्चा रंगली आहे.
रत्नागिरी आणि परिसरातील आंबा बागांमध्ये आंबे काढण्यासाठी दरवर्षी नेपाळमधून मोठ्या संख्येने मजूर येत असतात. झाडावर चढून शिताफीने आंबा काढण्यात हे मजूर अत्यंत पटाईत असतात. मात्र, यंदा नेपाळहून येणार्या मजुरांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याने बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कडक ऊन आणि वाढता उकाडा यामुळे वेळेवर आंबा न काढल्यास तो झाडावरच पिकून खराब होण्याची भीती निर्माण झाली होती.
(आंबेशेत कर्ला वायंगणकरवाडी) येथील प्रगतशील बागायतदार वैभव सुरेश वायंगणकर यांच्यासमोरही हाच यक्षप्रश्न उभा होता. बागेत आंबा तयार झोला होता, पण काढण्यासाठी मजूर उपलब्ध नव्हते मजुराची वाट न पाहता क्रेन पाचारण केली.www.konkantoday.com




