
बॉक्साईट प्रकल्प नको, पर्यावरणपूरक प्रकल्प आणा‘ राजापूर पंचायत समितीची मासिक सभेत
राजापूर पंचायत समितीची मासिक सभा किसान भवन सभागृहात सभापती नंदिनी कदम यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपसभापती अभिजीत गुरव, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे आदी उपस्थित होते. कातळी पं. स. सदस्य पंढरीनाथ मयेकर यांनी यांनी बॉक्साईटचा विषय उपस्थित करीत ग्रामस्थांचा पूर्ण विरोध असल्याचे सभेत निदर्शनास आणून दिले. या प्रकल्पाचे परिणाम आंबा, काजू, पाणी यावर होणार आहेत. यामुळे पर्यावरणावर परिणाम होणारा प्रकल्प नको तर पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्यात यावेत अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीस सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शविला.
उपसभापती अभिजीत गुरव यांनी सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. आरोग्य विभागाचे अधिकारी मुजोर झाले असून त्यांना पं. स. सदस्यांना सरळ उत्तरे देता येत नसतील तर हे सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य कसे सांभाळणार असा संतप्त सवाल उपस्थित केला. जे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात लेखी तक्रार आहे त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा मुद्दाही उपस्थित झाला. यावेळी संबधित अधिकार्यांबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी करण्यात आल्या असल्याचे उपस्थित अधिकार्यांनी सांगितले.
www.konkantoday.com




