पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने भाट्ये खाडीतील गाळाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार


भाट्ये खाडीतील गाळाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा यासाठी भाट्ये ते मांडवीदरम्यान समुद्र आणि खाडीदरम्यान सुमारे एक किलोमीटर लांबीचा ग्रोएन्स टाईप बंधारा बांधला जाणार असून या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. सुमारे ९५ कोटी रुपयांचे हे काम असून दोन वर्षात पूर्ण करण्याचा कालावधी असणार आहे. या बंधार्‍यामुळे खाडीत येणार्‍या गाळाला आळा बसणार असून नौकांना ये-जा करणारे चॅनल सुरक्षित होणार आहे.
सध्या भाट्ये खाडी आणि समुद्रा दरम्यान मोठ्याप्रमाणात गाळ साचला असून हा गाळ काढण्यासाठी सुमारे सव्वाशे कोटीहून अधिक रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. गाळ उपशाच्या या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. दरम्यान, गाळाचा हा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघावा होणार भाठ्ये खाहीत येणार्‍या मासेमारी नौकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन-तीन वर्षापासून याचा पाठपुरावा करीत मेरीटाईम विभागाला या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
भाट्ये पुलापासून मांडवीच्या दिशेने समुद्रात सुमारे एक हजार मीटर लांबीची ग्रोएन्स पध्दतीचा बंधरा बांधला जाणार आहे. यासाठी सीआरझेडसह सर्वच परवानग्या मिळाल्या असून या बंधाज्याच्या कामासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
भाट्येच्या किनार्‍यावर सध्या साफसफाईचे काम ठेकेदार कंपनी निर्माण कन्स्ट्रक्शनने सुरु केली आहे. भाट्ये पूल ते पोलीस चौकी दरम्यान रस्त्यावरुन किनार्‍यावर उतरण्यासाठी रस्ता तयार केला जात आहे. पुलापासून पश्चिमेच्या दिशेने समुद्रात खाडीला समांतर हा बंधारा होणार आहे. त्यामुळे समुद्राच्या लाटांबरोबर येणारा गाळ या बंधार्‍यालाच अडकून खाडीचे चॅनल गाळापासून संरक्षित होणार आहे. हा बंधारा बांधण्यासाठी सुमारे दोन वर्षांची मुदत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button