कालुस्ते खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणूक;दाऊद जबले यांची बिनविरोध निवड

चिपळूण : तालुक्यातील कालुस्ते खुर्द मजरेकाशी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून दाऊद अन्वर जबले यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी भारतीय जनता पक्षचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते जबले यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला अन्वरभाई जबले, शमूनभाई घारे, इसाभाई हळदे, गुलजारभाई कुरवले, राकेश दाते, रुपेश आवले, कैसरभाई परकार तसेच भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते साद सुर्वे उपस्थित होते.

दाऊद जबले यांच्या बिनविरोध निवडीमुळे ग्रामपंचायत स्तरावर विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनीही या निवडीचे स्वागत करत आगामी काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button