
अंधश्रद्धा पसरवून फसवणूक करणार्या भोंदूबाबाविरोधात कठोर कारवाई करा -सिटू संघटनेची मागणी
राज्यात भोंदू बाबांकडून फसवणूक व अंधश्रद्धेचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अनेक सामान्य नागरिक याला बळी पडत असून अंधश्रध्दा पसरवून फसवणूक करणार्या भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाई करा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा जनरल कामगार युनियनच्या (सिटू) वतीने शासनाकडे करण्यात आली.
दि. ६ एप्रिल २०२६ रोजी चिपळूण तहसील कार्यालयात युनियनचे अध्यक्ष सुभाष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस संदीप पवार यांनी नायब तहसिलदार खरात यांच्याकडे हे निवेदन सुपुर्द केले. सदर निवेदनामध्ये भोंदू बाबा अशोक खरात व त्याच्या सहकार्यांविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच अंधश्रद्धा पसरवणार्या प्रवृत्तींवर तातडीने अंकुश आणावा, अशी मागणी करण्यात आली.
www.konkantoday.com




