भाजपचे फायरब्रँड नेते सुवेंदु अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती


पश्चिम बंगालच्या राजकारणात आज एका नव्या युगाची पहाट झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव करणारे भाजपचे फायरब्रँड नेते सुवेंदु अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.बंगालचा भूमिपुत्रच राज्याचा मुख्यमंत्री होईल’ हा शब्द भाजपने पाळला असून सुवेंदु अधिकारी यांच्या रूपाने राज्याला नवा नेतृत्व मिळाले आहे.

राजकीय वारसा

सुवेंदु अधिकारी यांनी आपली राजकीय वाटचाल एका मजबूत राजकीय वारशातून पुढे नेली. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1970 रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी येथे एका प्रभावशाली राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे बंगालच्या राजकारणातील अत्यंत प्रभावशाली आणि आदरणीय नेते मानले जात होते. अनेक दशकांपासून संपूर्ण मेदिनीपूर भागात अधिकारी कुटुंबाचा प्रभाव राहिला आहे. शिशिर अधिकारी हे मनमोहन सिंग सरकारमध्ये केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री होते. सुवेंदु यांनी राजकारणातील सुरुवातीचे धडे आपल्या वडिलांकडूनच घेतले.

त्यांनी 1989 मध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना “छात्र परिषद”मधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्या काळात संपूर्ण बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचे वर्चस्व होते. अशा परिस्थितीत विरोधी विद्यार्थी नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. 1995 मध्ये कांथी नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी औपचारिक निवडणूक राजकारणात प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button