
चवदार तळे सौंदर्यीकरणासाठी ५५ कोटी ७९ लाखांचा निधी -ना. भरत गोगावले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून चवदारतळे सौंदर्यीकरणाच्या कामासाठी सामाजिक न्याय विभागाने ५५ कोटी ७९ लाख ८५ हजार ६५३ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाडचे आमदार आणि राज्याचे मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सामाजिक न्याय विभागाचे मंत्री ना. संजय शिरसाट यांनी विशेष बाब म्हणून हा निधी मंजूर केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
www.konkantoday.com




