
रत्नागिरीची पायल राज्य खो-खो संघात
काजीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राऊंडवर दि. ११ ते १५ जानेवारी दरम्यान होणार्या ५८ व्या पुरूष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आपले पुरूष व महिला संघ जाहीर केले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याची राष्ट्रीय खेळाडू पायल पवार हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजर्षि शाहू कन्या शाळेच्या मैदानावर यशस्वीरित्या झाले. या शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस प्रा. जनार्दन शेळके व सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काजीपेठ, तेलंगणा येथे रवाना झाले.www.konkantoday.com




