
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील जंगम खूनातील संशयित भिंगार्डेचा जामीन फेटाळला
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील राकेश जंगम खून प्रकरणातील संशयित नीलेश भिंगार्डेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. खून प्रकरणातील मुख्य संशयित दुर्वास पाटील याने नीलेश भिंगार्डे व एका साथीदाराच्या मदतीने राकेश याचा गळा आवळून खून केला होता. यानंतर मृतदेह आंबा घाट येथे फेकून दिला, असा गुन्हा राकेश याच्याविरुद्ध जयगड पोलिसात दाखल करण्यात आला होता. तसेच पोलिसांनी नीलेश याला सांगली येथून अटक केली होती.
मागील ३ महिन्यांपासून जेलमध्य असलेल्या नीलेशने सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. गुन्ह्यातील माहितीनुसार, ६ जून २०२४ रोजी दुर्वास पाटील याने कोल्हापूर येथे जाण्याचा बहाणा करुन राकेश जंगम याला त्याच्या कारमधून नेलें. यावेळी कारमध्ये दुर्वास याच्यासोबत नीलेश भिंगार्डे व अन्य एक संशयित होता. आरोपींनी कारमध्ये राकेशचा गळा आवळूनं खून केला तसेच मृतदेह आंबा घाटात फेकून दिला, अशी बाब पोलीस चौकशीत उघडकीस आली होती.
www.konkantoday.com




