
मोठी बातमी! २१ डिसेंबरची MPSC परीक्षा पुढे ढकलली
२१ डिसेंबर रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी नगरपरिषदेचे निकाल लागत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ४ जानेवारी रोजी होणार होणार आहे. याबाबत अधिकृत परिपत्रक काढून माहिती देण्यात आली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ब (अराजपत्रित) परीक्षा रविवार २१ डिसेंबरला होणार होती. त्याच दिवशी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. आयोगाकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याआधी ही परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी होणार होती, परंतु पावसामुळे २१ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही परीक्षा ४ जानेवारी रोजी होणार असल्याचे जाहीर कऱण्यात आले आहे




