
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी येथून बेपत्ता नेपाळी खलाशाचा मृतदेह आढळला…
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी येथून बेपता झालेल्या नेपाळी खलाशाचा मृतदेह आढळला. समित तेजराम चौधरी (२१, रा. मिरकरवाडा मूळ रा. नेपाळ) असे मृताचे नाव आहे. समित हा माजी नगरसेविका वैभवी खेडेकर यांच्या मिनाक्षी या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. २५ ऑक्टोबर रोजी तो बोटीवरुन बेपत्ता झाला होता. यासंबंधीची माहिती त्याच्या नातेवाईकांनाही देण्यात आली होती. दरम्यान ३ नोव्हेंबर रोजी शहरातील मिरकरवाडा जेटी येथील पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.www.konkantoday.com




