रत्नागिरी शहराजवळील भाट्येत गव्याचे दर्शन


शुक्रवारी सकाळच्या सुमारास भाट्ये येथील निसर्गरम्य आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या झरी विनायक मंदिराच्या बाजूला असणार्‍या रस्त्यावर गवा रेडा अचानक दिसून आला. नेहमीप्रमाणे या मार्गावरून प्रवास करणार्‍या काही नागरिकांना हा गवा रस्ता ओलांडताना दिसला. सुदैवाने यावेळी गव्याने कोणालाही इजा केली नाही, मात्र भररस्त्यात अचानक समोर आलेल्या या वन्यप्राण्यामुळे प्रत्यक्षदर्शीची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. शहराच्या अगदी जवळ असलेल्या मिरजोळे आणि कुवारबाव यांसारख्या वर्दळीच्या गावांत गव्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला होता. अन्न आणि पाण्याच्या शोधात हे प्राणी आता मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button