
महाड येथून दुचाकी चोरणार्या दुसर्या चोरट्यालाही पोलिसांनी पकडले
महाड येथून गुरुवारी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून चिपळूणकडे दुचाकीने पलायन केलेल्या दोन चोरट्यापैकी एकाला पोलिसांनी कामथे येथील जंगलातून मोठ्या शिताफीने पकडले होते. यावेळी पसार झालेल्या दुसर्याही चोरट्याला पकडण्यात गुरुवारी रात्री पोलिसांना यश आले. त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती चिपळूण पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे.
महाड येथे सोनसाखळी चोरून दुचाकीने भरधाव वेगाने चिपळूणकडे पलायन केल्याची माहिती जिल्ह्यातील पोलिसांना समजली होती. त्यानुसार ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. असे असताना पोलीस मागावर असल्याचे लक्षात येताच त्या चोरट्यांनी गाडीची नंबर प्लेट व अंगावरील कपडेही बदलले होते. त्यामुळे पोलिसांनाही थोडा त्यांनी चकवा दिला. पोलीस व कामथे ग्रामस्थांच्या मदतीने त्या दोन चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात आले होते. यावेळी दुसरा चोरटा जंगलात पळून गेला होता. पोलिसांनी केलेल्या शोध मोहिमेअंती रात्री उशिरा त्याही चोरट्याला पकडण्यात यश आहे. त्या दोघांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.www.konkantoday.com




