
संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे खालचीवाडी येथे विहिरीत पडलेल्या गव्याचा मृत्यू.
संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे खालचीवाडी येथे मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विहिरीत पडलेल्या गव्याचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, तगवारेडा विहिरीत पडल्यामुळे झालेल्या आवाजाने शेजारील लोक जमा झाले.त्यानंतर वन विभागाला या घटनेची खबर दिल्यावर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ व महामार्गावरील ठेकेदार कंपनीच्या क्रेनने मोठ्या जिकिरीने त्याला बाहेर काढले. गुरुवारी सकाळी 11.30 वा. पशुवैद्यकीय अधिकारी सोनाली शेटे यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यावर व पंचनामा झाल्यावर नदीकिनारी गवारेड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.




