आस्थामध्ये श्रवणदोष असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल पवई, मुंबई व आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून रविवार दि. 20/07/2025 रोजी जन्मतः व जन्मपश्चात श्रवणदोष असणाऱ्या, किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलतांना अडचण येणाऱ्या अशा सर्व बालकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी तसेच मोठया वयोगटातील व्यक्तींची मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सकाळी 09 ते दु. 03 या वेळेत “आस्था थेरपी सेंटर” परकार हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या शिबिरात श्रवण व वाचा दोष संदर्भात तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या संदर्भ सेवा व त्यांच्या पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल.या शिबिरात कान, नाक, घसा तज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण व ऑडिओलॉजिस्ट श्रीम. प्राजक्ता भोगटे सात वसे या मुलांच्या ऐकण्या व बोलण्या संदर्भातील समस्यांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराला येतांना पालकांनी मुलांच्या पूर्व तपासणी रिपोर्ट सोबत आणावेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणतेही श्रवण व वाचादोष असलेले बालक उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, लवकरात लवकर योग्य निदान होऊन बालके आवश्यक उपचारानंतर मुख्य प्रवाहात यावी यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे.

OAE, BERA, PTA या वैयक्तिक तपासण्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ना नफा ना तोटा तत्वावर शुल्क आकारून आकरण्यात येतील ,असे याप्रसंगी आस्था दिव्यांग हेल्पलाईनचे प्रमुख समन्वयक व स्पीच थेरपीस्ट श्री. संकेत चाळके यांनी सांगितले. जिल्ह्यातील बालरोग तज्ञ, कान नाक घसा तज्ञ, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी त्यांच्या संपर्कातील अशा बालकांच्या पालकांना या शिबिराची माहिती द्यावी जेणेकरून कोणी सुटणार नाही असे आवाहन आस्थाच्या सचिव व प्रकल्प संचालक श्रीम. सुरेखा पाथरे यांनी केले आहे. या शिबिरासाठी नाव नोंदणी पालकांनी 10 ते 6 या वेळत कॉल करून 7045452424 या नंबर वर करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button