संगमेश्‍वर तालुक्यातील किरबेट येथे चूल पेटविताना भाजल्याने महिला जखमी


संगमेश्‍वर तालुक्यातील किरबेट येथे जेवण करण्यासाठी चूल पेटविताना आगीचा भडका उडाल्याने महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षदा संतोष अंकुशराव (४७) असे भाजलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत अक्षदा या ६० टक्के भाजल्या आहेत.
घटनेनंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी प्रथमोपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ल्याने अक्षदा यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहे. अक्षदा अंकुशराव चूल पेटविण्यासाठी लाकडावर रॉकेल ओतून ते पेटवले. यावेळी आगीचा भडका उडून अक्षदा यांच्या अंगावरील नायलॉनच्या साडीने पेट घेतला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. याबाबतची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button