
रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्यांसह ३२ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना कारणे दाखवा नोटिसा
सरकारी रुग्णालयांमध्ये अचानक भेटी दरम्यान काही रुग्णालयात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्यांसह ३२ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही कारवाई कोल्हापूर परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने. यांनी केली. याकारवाईने चार जिल्हातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयांच्या कामकाजात निष्काळजीपणा करणार्यांवर आरोग्य विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. कोल्हापूर मंडळातील एकूण ३२ शासकीय रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. सर्वच ३२ रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्याने कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी २५ सप्टेंबर रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिल्यानंतर आता विभागीय स्तरावर हालचालींना वेग आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांच्या वतीने जिल्हा, महिला, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांवर विशेष तपासणी मोहीम राबविली जात *आहे. या मोहिमेसाठी एकूण १६ तपासणी पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकात वैद्यकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश आहे. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांच्या पथकांनी ३२ सरकारी रुग्णालयांची तपासणी केली.www.konkantoday.com




