दारुच्या नशेत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा खाडीत बुडून मृत्यू , गुहागर येथील प्रकार


गुहागर येथे दारुच्या नशेत खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा खाडीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 वा.कालावधीत घडली आहे.असलम अब्दुल करीम दळवी (56,रा.पांगारीतर्फे हवेली भूरकुंडा,गुहागर) असे बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा तोफिर असलम दळवी याने गुहागर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार,त्याचे वडिल असलम दळवी यांना दारुचे व्यसन होते. शुक्रवारी सकाळीही ते दारुच्या नशेत खाडीत खेकडे पकडण्यासाठी गेले होते.सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे मुलाने खाडीत जाउन पाहिले असता त्याला त्याचे वडिल खाडीच्या पाण्यात बुडून मयत स्थितीत दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button