
लोटेतील ’लक्ष्मी ऑर्गेनिक’ला टाळे ठोका, माजी खासदार हुसेन दलवाई आक्रमक
कोकणात आधीच निसर्गाचा र्हास करून मानवी जीवनावर परिणाम करणार्या अनेक कंपन्या असताना त्यात आता शासनाने लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीची भर टाकली आहे. या कंपनीला तातडीने टाळे ठोका, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. या विरोधात ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, ही कंपनी इटलीत मिटेनी नावाने सुरू होती. मात्र तेथे होणारा त्रास लक्षात घेता तेथील शासनाने त्यांच्यावर बंदी आणत कायदेशीर कारवाई केली. या कंपनीत पीएफएए नावाने केमिकल तयार केले जाते. ज्याचे विघटन होत नाही. त्यामुळे याचा निसर्गासह मानवी जीवनावर मोठा परिणाम होणार असल्याने त्याचा विचार करून आम्ही या कंपनीला विरोध करीत आहोत. हा विरोध राजकारणातून नसून सामाजिक भावनेतून आहे. त्यामुळे या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याची गरज आहे. रस्ते चांगले करून पर्यटन वाढीला चालना देणेही सहजशक्य होणार आहे. मात्र तसे करता १४ वर्षे महामार्गाचे काम रखडवून ठेवण्याचे काम सरकारने केले आहे.www.konkantoday.com




