रत्नागिरीत प्रभाग १० साठी २० रोजी मतदान


रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० साठी घेण्यात येणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधात नेमणुका व तारखा निश्चित करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जारी केले आहेत. प्रभाग क्र. १० (जागा १० अ व १० ब) मधील सदस्य पदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडील आदेशानुसार, जिल्हाधिकारी जिंदल यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग १० साठी घेण्यात येणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधात पुढील नेमणुका व तारखा निश्चित करीत असल्याचे आदेश जारी केले आहेत. प्रभाग १० (जागा १० अ व १० ब) मधील सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. तर अपर तहसीलदार, शेतजमीन व न्यायाधिकरण, रत्नागिरी आणि निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार कार्यालय, रत्नागिरी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत, नामनिर्देशन मागे घेण्याचे ठिकाण निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, रत्नागिरी नगर परिषद कार्यालय, रत्नागिरी असणार आहे. आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ११ डिसेंबर आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button