
चरवेली ते कापडगाव दरम्यान जयगड ते कर्नाटक जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान चरवेली ते कापडगाव दरम्यान जयगड ते कर्नाटक जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती झाल्याने परिसरात घबराट पसरली. महामार्गावर चालत्या टँकरमधून होणारी गॅस गळती त्या टँकर चालकाला मागून येणाऱ्या वाहन चालकांनी सांगितल्यामुळे त्याने महामार्गावर टँकर थांबवला व काही वेळाने गॅस गळती थांबली अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती त्यामुळे महामार्गावरून धोकादायक स्थितीत होणाऱ्या एलपीजी वाहतुकीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.




