चिपळूण शहरात एकाच इमारतीतील दोन सदनिका फोडल्या


चिपळूण तालुक्यातील पेढे वडकर कॉलनी येथील एका इमारतीमधील दोन सदनिका फोडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. यामध्ये एका सदनिकेतून चोरट्याने २७ हजार ७५० रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरून नेली. दुसर्‍या एका सदनिकेचाही कडीकोयंडा तोडला. मात्र चोरट्याच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची फिर्याद भास्कर उमाजी मंडले (३६, चिपळूण) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेढे वडकर कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी भास्कर मंडलें हे भाड्याने राहत असलेल्या सदनिकेच्या दरवाजाचा कडी- कोंयडा कोणत्यातरी हत्याराने फोडला. यानंतर सदनिकेमध्ये प्रवेश करून कपाटात ठेवलेली २७ हजार ७५० रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरून नेली.
तसेच त्याच इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर राहणारे संजय पवार (पेढे) यांची सदनिकादेखील चोरट्याने फोडली. मात्र या सदनिकेतून चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. हा प्रकार मंडले यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button