पारगावमधील चित्रकाराने आदरापोटी रेखाटले बैलाच्या अंगावर मुख्यमंत्र्यांचे चित्र

0
285

सातारा जिल्ह्यात सर्वत्र बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्ह्याचे सुुपुत्र ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने खंडाळा तालुक्यातील अजनूज येथे एका चित्रकाराने बैलाच्या अंगावर मुख्यमंत्र्यांचे चित्र रेखाटलेयाद्वारे कलाकार प्रशांत मोहिते यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.
बेंदूर सण मंगळवारी सर्वत्र साजरा झाला. खंडाळा तालुक्यातही अनेक गावांमध्ये बैलांची मिरवणूक काढण्यात आली. पारगावमधील चित्रकार प्रशांत मोहिते हे दरवर्षी बेंदरानिमित्त सद्यस्थितीच्या परिस्थितीचे चित्रण बैलाच्या अंगावर रेखाटतात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री म्हणून ना. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. ना. एकनाथ शिंदे हे महाबळेश्‍वर तालुक्यातील दरे तर्फ गावचे आहेत. त्यांच्याबद्दल जिल्हावासियांना आदर आणि अभिमान असल्याचे दाखवण्यासाठी हे चित्र काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here