विकास करायचे असेल तर, स्थानिक उत्पादन वर प्रक्रिया करणे गरजेचे : डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिकं व महिला शेतकरी मेळावा” या कार्यशाळेचे दिनांक ३०-१२-२०२५ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे सन्मानिय कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता आसमंत फौंडेशन, रत्नागिरी कडून आर्थिक साह्य मिळाले.

या कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉ. चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शाश्वत विकास करायचे असेल तर, स्थानिक उत्पादन वर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच मत्स्य पदार्थांना मूल्यवर्धन शिवाय पर्याय नाही, याकरिता प्रशिक्षणाची जबाबदारी मा. कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी अवगत केल्याप्रमाणे कोकण कृषि विद्यापीठ घेत आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्राध्यापक डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन चे मत्स्य विकास अधिकारी श्रीमती लतिका गावडे उपस्थित होता. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती या उद्योगाला यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षणांर्थीना शुभेच्छा दिल्या. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. हरीश धमगाये, अभिरक्षक, प्रा. नरेंद्र चोगले, सहाय्यक संशोधन अधिकारी, प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी आणि श्रीमती वर्षा सदावर्ते, जीवशास्रज्ञ हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीमती अपूर्व सावंत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक यांनी केले.

या कार्यक्रमाकरिता शिरगाव, रत्नागिरी येथील रत्नसागर, शेतकरी उत्पादक कंपनी चे ५० महिला शेतकरीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या कार्यक्रम दरम्यान माशाचे अन्नातील महत्व याविषयी डॉ. आसिफ पागारकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच जवळा चटणी, कोलंबी लोणच, कालवी लोणच याचे प्रात्यक्षीक श्रीमती अपूर्व सावंत, श्रीमती वर्षा सदावर्ते, डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले आणि प्रा. सचिन साटम यांनी करून दाखविले.

शेवटी सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी प्रशिक्षण घेऊन सुरुवातीस छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरुवात करणे गरजेचे आहे. यावेळी सहभागी शेतकरी महिलांपैकी श्रीमती शिवलकर यांनी मनोगत व्यक्त केले आणि प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. हा कर्यक्रम यशस्वी करण्यास मत्स्य अभियांत्रिकी तंत्रज्ञान, रत्नागिरी येथील डॉ. राकेश जाधव, श्री. सुशील कांबळे, श्री. निलेश मिरजकर, श्री रोहित बुरटे, श्री. प्रतिक यादव, श्री. पंकज, श्री संदेश चव्हाण, श्री शुभम कांबळे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अधिकरी डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, श्रीमती वर्षा सदावर्ते आणि श्रीमती अपूर्व सावंत तसेच मजूर श्री सचिन चव्हाण, श्रीमती भूमी भाटकर श्री. तेजस जोशी, श्री योगेश पिलणकर, श्री. अभिजित मयेकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. प्रशांत पिलणकर, आणि श्री. केतन चव्हाण यांनी मेहनत घेतली.
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button