कोकणात पर्यावरणाचे नुकसान करणार्‍या अणुउर्जा प्रकल्पाला गोवळवासियांचा विरोध


कोकणात पर्यावरणाचे नुकसान करणार्‍या विनाशकारी प्रकल्पांना कधीच थारा दिला जाणार नाही. अणुऊर्जासारख्या विनाशकारी प्रकल्पालादेखील आमचा ठाम विरोध असून शासनाने हा प्रकल्प लादू नये, अशी भूमिका घेत समस्त गोवळवासियांनी प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पला विरोध करणारा ठराव करून तो शासनाकडे पाठविला आहे.
राजापूर तालुक्यातील गोवळ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील गोवळ वरचीवाडी आणि खालचीवाडी परिसरात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पासाठी कमाल मर्यादेपेक्षा अधिक क्षेत्र संपादित करण्याच्या हालचालींना तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने तहसीलदारांना अधिकृत पत्र पाठवून ग्रामस्थांची भूमिका स्पष्ट केली आहे. ग्रामपंचायतीने पाठविलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित महसूल गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा विनाशकारी प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध असून याबाबत २२ जून रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button