
खेड-लोटेमाळ शाळेत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकाचा आकस्मिक मृत्यू
खेड तालुक्यातील लोटेमाळ प्राथमिक शाळेत कार्यरत असणार्या धर्मराज नामदेव वाडकर (५६ रा. पाग-चिपळूण) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात बसले असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
www.konkantoday.com




