पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून रत्नागिरी विमानतळाच्या कामाची पाहणी


राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी रत्नागिरी विमानतळाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि सविस्तर आढावा घेतला.

​हे विमानतळ केवळ दळणवळण वाढवणार नाही, तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि रोजगाराच्या संधींना मोठी गती देणार आहे. काम अत्यंत दर्जेदार आणि जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रत्नागिरीकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न लवकरच साकार होत आहे. या विमानतळाच्या माध्यमातून रत्नागिरीसह कोकण भूमीच्या विकासाची ही झेप अशीच पुढे जात राहील, हा विश्वास आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button