खेड शहरातील दापोली नाका येथे वेल्डींग दुकान चोरट्यांनी फोडले; 29 हजाराचा ऐवज लंपास_________ खेड शहरातील दापोलीनाका येथील झमझम पार्क इमारत गाळ्यातील वेल्डिंगचे दुकान फोडून चोरट्यांनी २९ हजार २४० चा ऐवज लांबवला आहे. हि घटना ३१ रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास लक्षात आली होती.खेड शहरातील साठी मोहल्ला येथील दानीश यासीन जुईकर (४१) हे सध्या चिपळूण मिठागरे मोहल्ला येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे खेड येथील दापोली नाका भागात झमझम पार्क इमारतीच्या दक्षिण भागात दुकान गाळा आहे. तेथे वेल्डिंग वर्कशॉप ते चालवतात. दुकानात साहित्य ठेवून ते ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता ते घरी गेले होते. ३१ रोजी सकाळी ८:३० च्या सूमारास दुकानात आले तेव्हा दुकानाचे कुलूप उघडे दिसले. तसेच दुकानातील मिताशी कंपनीची हॅण्ड ड्रील मशी -२० हजार, मॅक्स कंपनीची वेल्डिंग मशीन -६ हजार, ऍंगल ग्राईंडर – १ हजार ३०० व मशीनची केबल १ हजार ४४० असा एकूण – २९ हजार २४० चा माल चोरट्यांनी चोरुन नेलाwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button