ताकच नव्हे तर पाणीही फुंकून प्या, आ. शेखर निकम यांनी दिला कार्यकर्त्यांना कानमंत्र


राजकारण अनुभवातून शिकवते. ताकच नव्हे तर पाणीही फुंकून प्या, असा मौलिक कानमंत्र आ. शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून संघटनात्मक तयारीला गती मिळाली असून, इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात झाल्या. देवरूख येथील आमदार शेखर संपर्क कार्यालयात आयोजित या मुलाखती ज्येष्ठ पदाधिकारी व पक्ष निरीक्षक विजयराव (आप्पा) गुजर आणि तालुकाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. या निवडणुका लवकर जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात असताना महायुतीसोबत अथवा स्वबळावर लढण्याचा पर्याय खुला ठेवत राष्ट्रवादीने स्थगिती आखण्यास प्रारंभ केला आहे. कोणतीही वेळ न दवडता संघटन मजबूत करणे, जनसंपर्क वाढवणे आणि स्थानिक ुमुद्दांवर पकड निर्माण करणे, यासंदर्भात इच्छूकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button