कोकणातील धनगरवाड्यांवर साजर्‍या होणार्‍या ’वाघबारस’ ही लोकपरंपरा आजही जीवंत


कोकणातील धनगरवाड्यांवर साजर्‍या होणार्‍या ’वाघबारस’ या लोकपरंपरेला जिवंत ठेवण्यासाठी सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या पुढाकाराने येथे आयोजित वाघबारसला विविध स्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्त वनविभागाकडून धनगरबांधवांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. धनगरवाड्यांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून चर्चा करताना वनखात्याकडून २० ब्लॅकेटसूचे वाटप करण्यात आले.
पाणवठ्याच्या जागी वाघाचे पूजन, वाघाचे चित्र प्रतिकात्मक रेखाटून, दिवा पेटवून पूजन व आराधना करण्यात आली. ’जंगलातील काहीही खा पण आमच्या जनावरांना फार त्रास देऊ नकोस’, अशी आर्त विनवणी यावेळी करण्यात आली. लांबून खास वाघबारस अनुभवण्यासाठी आलेले सहभागी, तसेच चेहर्‍यावर व शरीरावर वाघाचे रूप धारण करून सणाची शोभा वाढवणारी यमगरवाड्यातील लहान मुले, तरुण व ज्येष्ठ
मंडळी आणि सण पिढ्यान् पिढ्या जपणारी धनगर कुटुंबे या सर्वोच्या सहभागामुळे वाघबारस अधिक अर्थपूर्ण, जिवंत आणि संस्मरणीय ठरली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button