मुंबईतील प्रदर्शनासाठी विष्णू परिट यांच्या चित्राची निवड


संगमेश्वर तालुक्यातील साेनवडे येथील प्रतिथयश चित्रकार विष्णू परिट यांच्या जलरंग चित्राची निवड आर्ट साेसायटी ऑफ इंडियार्ते आयाेजित चित्रप्रदर्शनासाठी झाली आहे.
आर्ट साेसायटी ऑफ इंडिया ही देशस्तरावरील सध्या कलाकारांच्या कलेला प्राेत्साहन देण्यासाठी देशातील विविध भागात अनेक उपक्रम राबवत असते. देशातील चित्रकारांकडून चित्र-शिल्प मागवून त्यातून उत्तम कलाकृतीची निवड केली जाते. या सर्व कलाकृतींचे प्रदर्शन दरवर्षी मुंबई येथे भरवले जाते. यावर्षी या प्रदर्शनाचे हे 108 वे वर्ष आहे.
आर्ट साेसायटी ऑफ इंडियाने निवडलेले चित्र जयगड खाडीतील असून शांत जलाशयावर तरंगणरी हाेडी हे माझ्या जीवनप्रवासाचे प्रतीक आहे. आकाशातील साैम्य निळसर करड्या रंग छटा आणि दूरवर पसरलेला किनारा अंर्तुखतेची भावना निर्माण करताे, असे परिट म्हणाले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button