रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ; निम्मेच मानधन पदरात


रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि महिला बालकल्याण विभागाच्या नियमित कर्मचार्‍यांवर फेब्रुवारी महिन्यात आर्थिक संकट ओढवले आहे.
जिल्ह्यात २८१४ मंजूर पदांपैकी कार्यरत असलेल्या २७७८ अंगणवाडी सेविका आणि २८१४ मंजूर पदांपैकी कार्यरत २६१३ मदतनीस यांना या महिन्यात केवळ निम्मेच मानधन प्राप्त झाले आहे. – केंद्र शासनाचा मानधनाचा हिस्सा कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा झाला असला, तरी राज्य शासनाकडून मिळणारा हिस्सा अद्याप रखडल्याने
ग्रामीण भागात आरोग्य आणि पोषणाची जबाबदारी सांभाळणार्‍या या महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. १५ हजार रुपये प्रतिमहा मानधन घेणार्‍या सेविका आणि ८ हजार रुपये मानधनावर काम करणार्‍या मदतनीस यांना अल्प मानधनात घर चालवणे कठीण असताना, केवळ अर्ध्या रक्कमेवर महिना कसा ढकलायचा, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button